चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसनाची मागणी.

 चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसनाची मागणी.

--------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------------

कोल्हापूर तालुका शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यातील चांदोली अभयारण्य आणि मलकापूर येथील काही महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत (मंत्रालय) महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदार विनय कोरे यांनी चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसन आणि मलकापूर येथील अतिक्रमण नियमित करून प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत महसूल मंत्र्यांकडे मागणी केली.या बैठकीत आमदार विनय कोरे यांनी चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. यामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळेल आणि त्यांचे हक्क सुनिश्चित होतील, असे त्यांनी नमूद केले.

मलकापूर येथील अतिक्रमण नियमानुसार नियमित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील नगरपरिषद हद्दीतील गायरान गट क्रमांक ६८/अ वरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित करून तेथील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्डचे लवकर वितरण करण्याची मागणीही आमदार कोरे यांनी केली. या मागणीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी आशा आहे.

या दोन्ही समस्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. या बैठकीला महसूल आणि पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आमदार विनय कोरे यांनी या अधिकाऱ्यांशीही सखोल चर्चा केली.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.