खंडपीठासाठी युवक अनिकेत हिरवेचा खारीचा वाटा.
खंडपीठासाठी युवक अनिकेत हिरवेचा खारीचा वाटा.
---------------------------------
मलकापूर प्रतिनिधी
रोहित पास्ते
---------------------------------
हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, या मागणीसाठी मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील युवक अनिकेत हिरवे याने २०१६ साली मलकापूर ते मुंबई असा सायकल प्रवास करून आपला मोलाचा वाटा उचलला होता.
१२ जानेवारी २०१६ रोजी अनिकेत हिरवे मलकापूर येथून सायकल प्रवासाला रवाना झाला. अनेक दिवसांचा प्रवास करत तो मुंबईत दाखल झाला आणि मंत्रालयात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खंडपीठ स्थापन करण्यासह काही मागण्यांचे निवेदन सादर केले.
या उपक्रमासाठी आमदार व सध्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तसेच खासदार संभाजीराजे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
आज खंडपीठ वास्तवात येत असताना त्या मागणीसाठी २०१६ मध्ये केलेला युवकाचा हा प्रयत्न सर्वांच्या लक्षात येत आहे. अनिकेत हिरवे यांच्या या पावलाने खंडपीठाच्या लढ्यात युवकांचाही सहभाग अधोरेखित केला आहे.
Comments
Post a Comment