Header Ads

शहरी व ग्रामीण भागात वेध गणेशोत्सवाचे.

 शहरी व ग्रामीण भागात वेध गणेशोत्सवाचे.

--------------------------------- 

कळे प्रतिनिधी

साईश मोळे

9595316266

--------------------------------- 

पन्हाळा:-गणपती बप्पा मोरया या लाडक्या  गणरायाचे आगमन होण्यास बोटावरती मोजण्या इतकेच दिवस शिल्लक आहेत.या गणरायाचे स्वागत आनंदमय,मंगलमय,भक्तीमय वातावरणात,पारंपारिक वाध्यांचे बाज ,आतेषबाजी,गुलालाची उदळ,विधुत रोषणाई,मुर्ती स्थानपन करण्यासाठी मंडप,सजावट यासह विविध कारणास्तव शहरी भागासह ग्रामीण भागातील गणेश भक्त ,विविध तरुण मंडळे यांची लगबग सुरु आहे.काही ठिकाणी कुंभार बांधव गणेश मुर्तीवरती आखेरचा कलर देण्यासाठी कुंभारवाडे रात्रतीचे दिवस करण्यासाठी आहोरात्र झटत आहेत. गणरायाचे मंडप घालताना पावसाची अचानकपणे होणारी रिपरिप शुभ कामात व्यत्यय येत आहे.गणरायाच्या आगमनासाठी लागणाऱ्या पारंपरिक वाध्यांचे सुपारी देण्यासाठी कार्यकर्ते आहोरात्र मेहनत घेत आहेत.

No comments:

Powered by Blogger.