महापालिकेच्यावतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पण.
महापालिकेच्यावतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पण.
----------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
संस्कार कुंभार
----------------------
कोल्हापूर :- महापालिकेच्यावतीने हुतात्मा स्मारक, प्रतिभानगर, सागरमाळ येथे क्रांती दिनानिमित्त जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक एस.आर.पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले व हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली, पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, उप-आयुक्त परितोष कंकाळ, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर व अनेक मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत, बिगुल वादक केले. तसेच स्वातंत्र्य सैनिकांची नांवे असलेल्या फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रशासन अधिकारी डी.सी.कुंभार, उपशहर अभियंता अरुण गुजर, सुरेश पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, शाखा अभियंता सुरेश पाटील, पदमल पाटील, खादी ग्राम उद्योग अध्यक्ष सुंदरराव देसाई, जेष्ठ नागरी सेवा संघाच्या अध्यक्षा मंगल पाटील, प्रा.रुपा शहा, माजी नगरसेवक अशोक जाधव, राजू हुंबे, जर्नादन पोवार, उमेश बुधले, सुर्यभान पोवार, अशोक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते व नागरीक आदी उपस्थित होते.
यानंतर शास्त्रीनगर येथील लालबहाद्दुर शास्त्री यांच्या पुतळयास तसेच हुतात्मा पार्क मधील क्रांतीवीर कै.दत्तोबा तांबट व स्वातंत्र्यसैनिक कै.बळवंतराव बराले यांच्या पुतळयांनाही पुष्पहार अर्पण केले.
Comments
Post a Comment