जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले,वडगांव गुन्हेगारी व अवैध धंद्याचा फैलाव — पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासमोर मोठे आव्हान.

 जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले,वडगांव  गुन्हेगारी व अवैध धंद्याचा फैलाव — पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासमोर मोठे आव्हान.

----------------------------

जयसिंगपूर प्रतिनिधी

नामदेव भोसले

----------------------------

हातकणंगले, शिरोळ, वडगाव आणि जयसिंगपूर परिसरात गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. खुलेआम सुरू असलेले मटका-जुगार, दारू, गुटका, गांजा विक्री, मोबाईल चोरी, खाजगी सावकारी व तगादा, तसेच कॉलेज परिसरातील दहशत यामुळे कायदा-सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

औद्योगिक विकासासोबतच वर्चस्ववादाच्या संघर्षात धमक्या, दमदाटी आणि हिंसक घटना वाढत आहेत. कारखानदारांकडून कामगार पुरवठ्याच्या ठेक्यासाठी होणारी रस्सीखेच अनेकदा गुन्हेगारीत रूपांतरित होत असून, अल्पवयीन तरुणांचा यात सहभाग चिंताजनक आहे.

अवैध धंद्यांतून मिळणारा सहज पैसा आणि पोलिसांची प्रभावी कारवाई नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. यामुळे परिसरातील युवक नशेच्या आहारी जात असून, गंभीर गुन्ह्यांत ओढले जात आहेत. परप्रांतीयांमधील वर्चस्ववादामुळे होणाऱ्या झटापटी, चोरी, वाटमारी यांची नित्याची मालिका स्थानिक शांततेस बाधा ठरत आहे.

पोलीस उपअधीक्षक (DYSP) अमोल ठाकूर यांच्यासमोर आता या गुन्हेगारीच्या जाळ्यावर आळा घालण्याचे मोठे आव्हान उभे आहे. स्थानिक नागरिकांनी कडक कारवाई आणि सततच्या पोलिस गस्तीद्वारे कायदा-सुव्यवस्थेला मजबुती देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


चौकट...

नशेच्या आहारी युवक वर्ग गुटखा, दारू अड्डे, मटका, गांजा आणि इतर नशेच्या पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. सहज पैसा मिळविण्याच्या मोहापोटी अल्पवयीन आणि तरुण वर्ग गुन्हेगारीच्या मार्गावर जात आहे. या नशेच्या भरातच गंभीर गुन्हे घडल्याच्या घटना तालुक्यात वारंवार घडल्या आहेत. अमोल ठाकूर यांची कसोटी हातकणंगले उपविभागातील समृद्धीचा वारसा या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे धोक्यात आला आहे. आता नव्याने नियुक्त झालेले पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर हे या अवैध धंद्यांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यात कितपत यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.