Header Ads

कुंभोजमधील गावकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. गावठाण घरकुल लाभार्थ्यांना मिळणार घरकुल लाभ.

 कुंभोजमधील गावकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. गावठाण घरकुल लाभार्थ्यांना मिळणार घरकुल लाभ.

--------------------------- 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

--------------------------- 

     कुंभोज गावठाणमधील लाभार्थ्यांचे असेसमेंट उताऱ्यावर महाराष्ट्र सरकार नाव लागते त्यामुळे त्यांना कित्येक वर्षे घरकुल लाभ घेता येत न्हवता.. म्हणून मी माझ्या सहकारी मित्रांसोबत मंगळवारी ग्रामविकास अधिकारी यांच्यासोबत लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी केली त्यावेळी गावातील प्रमुख नेते तथा जवाहरचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले साहेब यांनी त्वरित गेल्या बुधवारी प्रांत दिपक शिंदे यांचे सोबत बैठक लावली होती तेव्हा प्रांताना निवेदन दिले..  

      सदर बैठकीत गावठाण जागेतील लाभार्थ्यांनी अर्ज करावे असे प्रांत साहेबांनी शिष्टमंडळास सांगितले.. त्यामुळे घरकुल मिळणेबाबत कुठेही धावपळ न करता ग्रामस्थांनी कुंभोज ग्रामपंचायत येथे अर्ज करून लाभ घ्यावा...

     तसेच मी गावठाण प्लॉटचे सातबारा होणेबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना सांगून जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक लावली होती.. त्या कामाची सुरुवात येत्या सोमवार पासून सुरू होणार आहे.. प्रांत शिंदे यांनी मंडल अधिकारी यांना कॉलद्वारे सांगितले आहे.. त्यामुळे लवकरच तलाठी दप्तरी प्लॉट धारकांचा सातबारा निघणार..

     प्रांत दिपक शिंदे यांना निवेदन देतेवेळी संजय गांधी निराधार कमिटीचे संचालक संदेश भोसले जव्हार कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले , ग्रा.पं.सदस्य अनिकेत चौगुले, मा.ग्रा.पं. सदस्य सागर कांदेकर, अब्बास पठाण, विशाल पांडव, गणेश भोसले आदी उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज

No comments:

Powered by Blogger.