बर्की शाळेत पर्यावरण पूरक रक्षाबंधन झाडांना राखी बांधून, जपले वृक्ष प्रेम.
बर्की शाळेत पर्यावरण पूरक रक्षाबंधन झाडांना राखी बांधून, जपले वृक्ष प्रेम.
----------------------------------
शाहुवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
मो .9404477703
----------------------------------
शाहुवाडी : बर्की येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवल्या राख्या व पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरी केले. या शाळेतील विद्यार्थ्यांनी व मुलांनी घरातील लग्नपत्रिका, कागद, मनी, खराब झालेले रिबीन्स, यापासून राख्या बनवल्या होत्या. हा उपक्रम राबवत असताना एकही वस्तू विकत आणलेले नाही, त्यामुळे झिरो बजेट राखी सुंदर उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील सर्व मुलींनी मुलांना ओवाळले व, गोड खाऊ दिला, राखी बांधून बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण साजरा केला. दुर्गम भागातील शाळेत असा उपक्रम राबवल्यामुळे सर्व मुलांचे चेहरे आनंदून गेले होते. यावेळी सर्व शाळेतील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक दशरथ आयरे, शिक्षक रवींद्र माने यांनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले व योग्य प्रकारे नियोजन केले. तसेच पालक वर्ग व शालेय व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभले.
No comments: