दुधगंगा नदीवरील पुलाजवळ कचऱ्यामुळे दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
दुधगंगा नदीवरील पुलाजवळ कचऱ्यामुळे दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
----------------------------------
कागल प्रतिनिधी
सलीम शेख
----------------------------------
: कागल येथील दुधगंगा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. या कचऱ्यामध्ये दवाखान्यातील आणि चिकन दुकानांतील कचरा मोठ्या प्रमाणावर असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
कागल शहरातील दूधगंगा नदीचा पूल नेहमीच वर्दळीचा असतो. मात्र, या पुलाच्या दोन्ही बाजूला काही बेजबाबदार लोक मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. यात विशेषतः हॉटेल्समधील शिल्लक राहिलेले अन्न, चिकन दुकानांतील कचरा आणि धक्कादायक बाब म्हणजे दवाखान्यातील वैद्यकीय कचराही आढळतो आहे. यामुळे परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली असून, वातावरण दूषित झाले आहे.
येथील नागरिक आणि प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या कचऱ्यामुळे परिसरात दिवसभर दुर्गंधी जाणवते. यामुळे श्वास घेणेही कठीण झाले आहे. पावसाळ्यात तर ही परिस्थिती अधिकच गंभीर होते. कचरा थेट नदीत मिसळल्यास नदीचे पाणी प्रदूषित होण्याची भीती आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
यावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. तसेच, या भागाची नियमित स्वच्छता करण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. अन्यथा, या गंभीर समस्येमुळे कोणताही मोठा आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौकट
कागल येथील दुंधगंगा नदीवरच्या दोन्ही बाजूला हॉटेल व चिकन व्यवस्थित यांचा करा नदीत मिळून स्थानिक नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. तसेच या भागात कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन कचरा टाकणाऱ्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.
अरुण सोनुले (माजी नगरसेवक कागल)
No comments: