कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तसह माजी उपमहापौर यांनी केली इको फ्रेन्डली गणपतीची श्रीगणेशा.

 कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तसह माजी उपमहापौर यांनी केली इको फ्रेन्डली गणपतीची श्रीगणेशा.


कोल्हापूर महानगरपालिकेचा पर्यावरण पूरक गणपती.

---------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------------

कोल्हापूर शहरातील महानगर पालीका शहराचे प्रतिनिधित्व करणारी स्थानिक स्वराज्य संस्था असून या महापालिकेत गेली अनेक वर्ष गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो.

 शहरातील इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे याही मंडळाकडून प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात.

शासनाच्या निर्देशानुसार व उच्च न्यायालयाचे आदेश नुसार पाण्याचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी केमिकल असलेले रंग व प्लॅस्टर ऑफ पॅरिस यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जन करण्यास निर्बंध घातले गेले आहेत परंतू होणारी मागणी व आवश्यक साहीत्य याची तफावत पडू लागल्याने कांही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. महापालीका प्रशासक यांचे निर्देशानुसार आपण आपली मूर्ती शाडू पासून बनवून घ्यावी अशी सूचना गत वर्षी केली होती.त्यानुसार गंगावेश मधील अवधूत निगवेकर यांना विचारणा करून सात महीने आगोदर मूर्ती तयार करण्यास सुचीत करण्यात आले.मूर्ती तयार होत असतानाच अविनाश निगवेकर यांनी या मूर्तीस इको फ्रेन्डली रंग देता येतील असे सुचवले व त्यानुसार सर्व चाचण्या पूर्ण करून मूर्तीस रंग उपलब्ध करून दिले

यामध्ये काहीं रंग हे खाण्यासाठी वापरले जाणारे रंग वापरले आहेत 

 अशा प्रकारे

कोल्हापूर शहरात प्रथमच चार फूट उंचीची मूर्ती कोल्हापूर महानगर पालीका सांस्कृतिक मंडळाकडून बसविण्यात आली आहे.

तसेच कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त के मजूंलक्ष्मी व माजी उपमहापौर अरूण निगवेकर यांनीही यावर्षी इको फ्रेंडली गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे 

हि मूर्ती कोल्हापूर येथील केदार पाडळकर यांनी तयार केली असून अवधुत निगवेकर यांनी कोल्हापूर महापालिकेची मूर्ती तयार केली असून या गणेश मूर्तीचे कलर माजी उपमहापौर अरुण व अविनाश निगवेकर याच्यां अरुण ग्रुपच्या ऐ पी पेन्टस या कंपनीने सदरचे पर्यावरण पुरक बिनविषारी (Eco-friendly non toxics) कलर उपलब्ध करून दिले आहेत.


माजी उपमहापौर अरुण निगवेकर यांच्या घरी पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना.

---------------------------

प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घरगुती गणपतीचे केले पर्यावरण पूरक विर्सजन.

----------------------------


 महानगरपालिकेच्या प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घरातील गणेश मुर्तीचे आज पर्यावरण पूरक विसर्जन केले. महापालिकेने ताराबाई पार्क येथे ठेवलेल्या पर्यावरण पूरक विर्सजन कुंडामध्ये हे विसर्जन केले. यावेळी त्यांच्या सोबत पती सबरीश पिलाई, मुलगा निलमाधव व मुलगी मिनाक्षी उपस्थित होते. पर्यावरण पूरक गणेश मुर्तीचे विसर्जन करताना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सर्व कोल्हापूरातील नागरीकांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पर्यावरण पूरक गणेश मुर्तींचे विर्सजन करुन कोल्हापूर महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.