वेतवडे केंद्र शाळेतुन एक राखी जवानांसाठी.
वेतवडे केंद्र शाळेतुन एक राखी जवानांसाठी.
------------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
9595316266
------------------------------
कळे:- पन्हाळा तालुक्यातील वेतवडे केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून एक राखी सीमेवरील जवानांसाठी रक्षाबंधन या उपक्रमांतर्गत स्वनिर्मित राख्या तयार करण्यात आल्या होत्या.
श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट ,कोल्हापूर आयोजित एक राखी जवानांसाठी या देशभक्तीपर सामाजिक उपक्रमात केंद्रीय प्राथमिक शाळा वेतवडे शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्वनिर्मित राख्या तयार केल्या.या उपक्रमासाठी प्र मुख्याध्यापिका उर्मिला तेली ,स्वप्नाली कलकुटकी ,सायरा तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी डी.ए पाटील ,शरद गुरव, सुशांत शिंत्रे हे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लता माने, उपाध्यक्ष तुकाराम दळवी सर्व सदस्य सहभागी होते.
कोल्हापूर विभाग
Comments
Post a Comment