कुरुंदवाडात २७ गावांमध्ये ‘ओपन मटका’; आदेश असूनही पोलिसांची डोळेझाक.
कुरुंदवाडात २७ गावांमध्ये ‘ओपन मटका’; आदेश असूनही पोलिसांची डोळेझाक.
------------------------------
कुरुंदवाड /प्रतिनिधी
नामदेव भोसले
------------------------------
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे, मटका-जुगार आणि अमली पदार्थ तस्करीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरही कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीत ‘ओपन मटका’ उघड उघड सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शहरातील बस्वेश्वर चौक, महाराणा प्रताप चौक, थिएटर चौक, पाण्याच्या टाकीजवळ तसेच पोलीस ठाणे हद्दीतील सर्व २७ गावांमध्ये दिवसाढवळ्या मटका खेळ सुरू आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक पोलीस याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असून, काही ठिकाणी मटकेवाल्यांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची चर्चा आहे.
---
📌 प्रमुख नावे चर्चेत
स्थानिक पातळीवर या अवैध धंद्यामध्ये प्रशांत चव्हाण आघाडीवर असल्याचे आरोप होत आहेत. त्याच्याशी संबंधित म्हणून जवाहर पाटील, सुनिल जुगळे, भबीरे या व्यक्तींची नावे देखील नागरिकांच्या चर्चेत आहेत. या संबंधांमुळे कारवाईला उशीर होत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
---
📍 आदेश असूनही कारवाईचा अभाव
अलीकडेच पदभार स्वीकारल्यानंतर एसपी गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, “जिल्ह्यात कोणताही अवैध धंदा चालू ठेवला जाणार नाही; दोषींवर थेट कारवाई होईल.” मात्र कुरुंदवाडात त्यांच्या आदेशांची पायमल्ली होत असून, कायद्याचा धाक कमी झाल्याचे चित्र आहे.
---
🚨 सामाजिक परिणाम
अनेक सुशिक्षित पण बेरोजगार तरुण या धंद्याकडे आकर्षित होत आहेत.
मटका खेळल्याने कुटुंबे कर्जबाजारी होत असून, घरगुती कलह वाढत आहेत.
जुगारामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे.
---
🗣️ नागरिकांचा सवाल
> "२७ गावांमध्ये मटका निर्धोक चालतोय, यामागे कोणाचा आशीर्वाद आहे? आदेश असूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही?" – एक स्थानिक व्यापारी
> "स्थानिक पातळीवर कारवाई झाली नाही, तर जिल्हा पातळीवरून कडक पाऊल उचलावे लागेल." – नागरिक
Comments
Post a Comment