कुरुंदवाड पोलीस ठाण्याची नूतन इमारत नागरिकांसाठी खुली:रविराज फडणीसआधुनिक सुविधा, पारदर्शक कार्यपद्धतीसाठी नवी उभारणी.
कुरुंदवाड पोलीस ठाण्याची नूतन इमारत नागरिकांसाठी खुली:रविराज फडणीसआधुनिक सुविधा, पारदर्शक कार्यपद्धतीसाठी नवी उभारणी.
------------------------------------
नामदेव भोसले
------------------------------------
कुरुंदवाड शहरातील पोलीस ठाण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य नूतन इमारतीची पाहणी नुकतीच करण्यात आली. या इमारतीत स्वतंत्र कक्ष, प्रतिक्षालय, बैठकीसाठी केलेली आधुनिक सोय तसेच नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पाहणीदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी नूतन इमारतीची सविस्तर माहिती दिली. पोलीस दलाच्या कामकाजात वेग व पारदर्शकता आणण्यास आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा पुरविण्यास ही इमारत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
नवीन इमारतीमुळे पोलीस प्रशासनाला आवश्यक सुविधा उपलब्ध होऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निश्चितच मदत होईल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
No comments: