Header Ads

शिरगाव येथील शेतकऱ्याचा शेतामध्ये बेशुद्ध अवस्थेत मृत्यू.

 शिरगाव येथील शेतकऱ्याचा शेतामध्ये बेशुद्ध अवस्थेत मृत्यू.

------------------------------ 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

------------------------------ 

राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथील शेतकरी महादेव पाटील हे वैरण आणण्यासाठी शेतामध्ये गेल्या असता बेशुद्ध अवस्थेत मृत्यू झाला असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली

त्याबद्दल अधिक माहिती अशी की शिरगाव येथील शेतकरी महादेव पांडुरंग पाटील वय वर्ष 51 हे आपल्या पाठार या नावाच्या शेतामध्ये वैरण आणण्यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजता गेले होते ते दुपारी एक पर्यंत आले नसल्याने घरातील मंडळींनी शेतामध्ये गेले होते त्यावेळेला महादेव पाटील हे शेतामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडले होते त्याला तातडीने भोगावती येथील लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये दाखल केले परंतु डॉक्टर यांनी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले परंतु ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर यांनी महादेव पाटील या शेतकऱ्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचे सांगितले

याबाबतची वर्दी अजिंक्य दिनकर पाटील यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिल्यावर राधानगरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शकाखाली हेडकॉन्स्टेबल जठार व तारडे हे करत आहेत

No comments:

Powered by Blogger.