सरपिराजीराव तलावजवळ उड्डाणपूलाची व काँक्रीटीकरण कामाच्या चौकशीची शिवसेनेकडून मागणी ! जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
सरपिराजीराव तलावजवळ उड्डाणपूलाची व काँक्रीटीकरण कामाच्या चौकशीची शिवसेनेकडून मागणी ! जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
----------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
----------------------------------
मुरगूडच्या सरपिराजीराव तलावजवळ उड्डाणपूल व्हावा तसेच सध्या सुरु असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याने त्याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात आली असून त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे .
मुरगूड ते गडहिंग्लज हा मार्ग अंत्यत महत्वाचा असून या मार्गावरच सरपिराजीराव तलावाचा सांडवा वाहतो त्यामुळे पावसाळ्यात चार महिने रस्त्यावर पाणीच पाणी असते . अशा परिस्थितीत पाण्यातून धोकादायक वाहतूक होते . यासाठी तलाव सांडव्याच्या ठिकाणी उड्डाणपूल होण्याची गरज आहे तो व्हावा या मागणी संदर्भात तसेच मुरगूड ते गडहिंग्लज पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरु आहे ते अंत्यत निकृष्ट दर्जाचे होत आहे . या कामाची गुणनियंत्रण विभागाकडून पडताळणी होवून चौकशी व्हावी . निकृष्ट काम करून शासनाच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या संबधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली .
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे ' उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे ' सुरेश चौगले ' जिल्हा वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील ' सागर भावके 'दिलीप माने यांचा समावेश होता.
Comments
Post a Comment