ग्रामीण भागातील युवती व महिलांनी अद्यावत कौशल्य प्राप्त करून स्वतः सोबत कुटुंबांची प्रगती साधावी.... श्री राजेंद्र चव्हाण.

 ग्रामीण भागातील युवती व महिलांनी अद्यावत कौशल्य प्राप्त करून स्वतः सोबत कुटुंबांची प्रगती साधावी.... श्री राजेंद्र चव्हाण. 

-------------------------------- 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे 

-------------------------------- 

राधानगरी : संगणक, ए आय, फॅशन डिझायन, हर्बल प्रॉडक्ट इत्यादी कोर्सचे अद्यावत कौशल्य कोर्स व सरावा द्वारे प्राप्त करून ग्रामीण भागातील युवती व महिलांनी स्वतः सोबत कुटुंबाची प्रगती करत शाश्वत विकासाचे ध्येय गाठावे असे , आव्हान इनसाईट कॉम्प्युटर इन्स्टिटय़ूट राधानगरी चे प्रमुख, श्री राजेंद्र चव्हाण यांनी केले.

मांगेवाडी ता. राधानगरी येथील स्वजन ज्ञान केंद्र,रीड इंडीया नवी दिल्ली संस्थेच्या 'स्किल टू सक्सीड' कार्यक्रमांतर्गत संगणक व फॅशन डिझाईन कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समिती प्रमुख सौ अरुणा मगदूम होत्या. 'रीड इंडिया ' ही संस्था भारतामधील ग्रामीण भागात 'समुदाय ग्रंथालय व संसाधन केंद्र ' द्वारे शाश्वत ग्राम विकासाचे काम गेली 18 वर्षे करत आहे. भारतातील 60 वे केंद्र नुकतेच राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी येथे सुरू झाले आहे. या केंद्राचा उद्देश राधानगरी परिसरातील दुर्गम भागातील ग्रामस्थांचा विशेषत: महिला व युवक यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे असे सामाजिक कार्यकर्ते सुहास चौगले यांनी सांगितले. 'स्किल टू सक्सीड' कार्यक्रमांतर्गत कोणकोणत्या कोर्सेसना यावर्षी प्राधान्य राहील याबाबत माहिती रीड इंडिया चे महाराष्ट्र सल्लागार विजय रानमाळे यांनी दिली. कोर्सच्या नियमावली, प्रमाणपत्र व भविष्यातील नियोजन याविषयी मार्गदर्शन प्रशिक्षक सौ छाया पाटील यांनी केले.शहीद वीरपत्नी लक्ष्मी महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य सागर शेडगे यांनी देखील उपस्थितांना संगणकीय शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपसरपंच सातापा

मगदूम सर, उद्योजक सागर मगदूम, सतिश कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन रीड केंद्र समन्वयक सौ. मेघाराणी रानमाळे यांनी केले. आभार प्रदर्शन संगणक प्रशिक्षक सुहास पाटील मांगोलीकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.