दिप पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींचे पोलीस स्टेशनमध्ये अनोखे रक्षाबंधन.

 दिप पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींचे पोलीस स्टेशनमध्ये अनोखे रक्षाबंधन.

------------------------------

जयसिंगपूर प्रतिनिधी 

नामदेव भोसले

------------------------------

   जयसिंगपूर पोलीस स्टेशन मध्ये दिप पब्लिक स्कूलच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

            अहोरात्र जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांचे आभार मानत त्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करून जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह सुमारे 25 पोलीस कर्मचारी बांधवांना  दीप पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी राखी बांधून व विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेले भेट कार्ड देऊन रक्षाबंधन हा सण साजरा केला.

        पोलीस स्टेशनमध्ये निरीक्षक सत्यवान हाके साहेबांनी विद्यार्थींना पोलीस स्टेशन मधील प्रत्येक विभागाचे कामकाज कसे चालते याची प्रात्यक्षिक माहिती दिली.

          माननीय व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलच्या प्राचार्य, शिक्षक यांनी विद्यार्थिनींच्याकडून पोलीस स्टेशनमध्ये घेतलेल्या या वेगळ्या राखी पौर्णिमेचे पोलीस व्यवस्थापनाने कौतुक करून धन्यवाद दिले.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.