Header Ads

डॉ.श्रीकृष्ण देखमुख यांना मुरगूड भूषण पुरस्कार.

 डॉ.श्रीकृष्ण देखमुख यांना मुरगूड भूषण पुरस्कार.

---------------------------

मुरगूड प्रतिनिधी 

जोतीराम कुंभार

----------------------------

     मुरगूड येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार व अध्यात्मिक गुरु डॉ.श्रीकृष्ण देशमुख यांना स्वातंत्र्यदिनी मुरगूड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

     शिवम प्रतिष्ठान ,कराड चे प्रणेते विख्यात विचारवंत इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते हा सन्मान मुरगूड कर नागरिकांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे.

  डॉ.श्रीकृष्ण देशमुख यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय ५० वर्षापूर्वीच सोडला असून जनसामान्यांना आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग दाखविण्यासाठी आपले सारे आयुष्य खर्ची घातले आहे.श्रीमद् भगवत गीते तील अनासक्त कर्मयोग ते आपल्या प्रवचनातून विषद करत असतात.देशभरात आणि परदेशात सुद्धा त्यांचे अनुयायी आहेत.त्यांनी उपनिषदावर व अनेक आध्यात्मिक ग्रंथांचे लेखन केले आहे.

सज्जन गड व रायगड जिल्यातील शिवथर घळी येथे त्यांनी दासबोध व भगवत गीतेवर आधारित अनेक शिबिरे घेतली आहेत. निस्वार्थ जीवनाची नव्वदी गाठलेल्या डॉक्टर काकांना मुरगुडकर नागरिकांचे निर्व्याज प्रेम आपुलकी व जिव्हाळा लाभलेला आहे.

   येथील एम जे लकी इंटरनॅशनल स्कूल च्या सौजन्याने हा भव्य सोहळा दत्तप्रसाद हॉल मध्ये आयोजित करण्यात आला आहे.

  या सोहळ्यासाठी डॉक्टर काकांचे असंख्य भक्त व अनुयायी उपस्थित रहाणार आहेत.

No comments:

Powered by Blogger.