संस्कृतीचा ठेवा जपणारा पर्यावरणपूरक 'गावळ्यांचा गणेश'
संस्कृतीचा ठेवा जपणारा पर्यावरणपूरक 'गावळ्यांचा गणेश'
------------------------------
संस्कार कुंभार
------------------------------
कोल्हापूर : सध्याच्या व्यावसायिकरण आणि दिखाव्याच्या युगात, सुर्वेनगर प्रभागातील दिलीप गवळी यांच्या परिवाराने 'गावळ्यांचा गणेश' या नावाने एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी कायमस्वरूपी फायबरच्या गणेश मूर्तीची घरात प्रतिष्ठापना केली असून, ही मूर्ती पारंपरिक गोडवा, पवित्रता आणि संस्कृतीची छटा दर्शवते.
आजकाल अनेक ठिकाणी गणेशमूर्तींना विकृत रूप देऊन, रासायनिक रंगांनी रंगवले जाते. ही भक्ती नसून, मूर्तीची विटंबना आहे, असे मत रंजना पाटील यांनी व्यक्त केले आहे. गवळी परिवार गेली अनेक वर्षे आपल्या उपक्रमांमधून हेच वेगळेपण जपत आहे. ते दरवर्षी आपल्या घरी समाजाला पूरक संदेश देणारे सजीव देखावे साकारतात, ज्यामुळे पाहणाऱ्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळते.
गौरी-गणपतीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजातील वाद्यांना फाटा देत गवळी परिवाराने महिलांच्या लेझीम खेळाला प्राधान्य दिले. यामुळे महिलांच्या कलेला प्रोत्साहन मिळाले. 'गावळ्यांचा राजा' हा भावी पिढीसाठी निश्चितच आदर्श ठरेल, असे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा प्रवक्त्या रंजना पाटील यांनी सांगितले.
No comments: