पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तरुणांनी सज्ज राहावे - सुमेद कांबळे.

 पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तरुणांनी सज्ज राहावे - सुमेद कांबळे.

---------------------------------

इस्लामपूर प्रतिनिधी 

किशोर जासूद

---------------------------------

पुणे – येत्या काही दिवसांत होणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली असून, यंदा या निवडणुकीत युवकांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे. आजच्या बदलत्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक घडामोडींमध्ये तरुण वर्गाने मतदार म्हणून सजग होणे गरजेचे आहे, असे मत सुमेद कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.पुणे पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आजोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पदवीधर मतदारसंघ हा विशेषतः उच्च शिक्षित मतदारांसाठी असतो. त्यामुळे शिक्षण, रोजगार, संशोधन, स्टार्टअप्स, पर्यावरण, तंत्रज्ञान अशा अनेक मुद्द्यांवर विधायक भूमिका घेणारे प्रतिनिधी निवडण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

विद्यार्थीदशेतून बाहेर पडलेल्या आणि नुकतेच पदवी संपवलेले असंख्य युवक या निवडणुकीत प्रथमच मतदान करणार आहेत. मात्र अनेकांना अद्याप निवडणुकीविषयी, मतदार नोंदणीविषयी किंवा उमेदवारांविषयी पुरेशी माहिती नसते. हीच पोकळी भरून काढण्यासाठी विविध महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था व निवडणूक आयोगाने जनजागृती मोहिमा राबवण्याची गरज आहे.

‘मतदान हे केवळ अधिकार नसून जबाबदारी आहे’, हे तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या मतदानातूनच एक जागरूक, सक्षम आणि प्रगतीशील समाज तयार होऊ शकतो. केवळ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून किंवा ट्रेंड फॉलो करून नव्हे, तर थेट मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन बदल घडवता येतो.


महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि विचारशील तरुणांनी मतदानाच्या माध्यमातून आपली मतप्रदर्शनाची ताकद दाखवणे ही काळाची गरज आहे.

तरुणांनो, हीच तुमची वेळ आहे सज्ज व्हा, असे आवाहन देखील त्यांनी केले(

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.