तळंदगे येथे ऊसाच्या शेतात अर्भकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांचा तपास सुरू.

तळंदगे येथे ऊसाच्या शेतात अर्भकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांचा तपास सुरू.

-------------------------------------- 

तळंदगे प्रतिनिधी

सलीम शेख 

-------------------------------------- 

: तळंदगे येथील धोंडीबा नानासो फडतारे यांच्या ऊसाच्या शेतात तीन महिन्यांच्या अंदाजे अर्भकाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दिनांक ८ ऑगस्ट उघडकीस आली असून याप्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळी ९ वाजता धोंडीबा फडतारे शेतात गेले असता त्यांना एका ठिकाणी माती उकरलेली दिसली. संशय बळावल्याने त्यांनी मुलगा विनोद फडतारे यांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस पाटील समीर मुल्लानी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तात्काळ हुपरी पोलिसांना कळवताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळी पुन्हा खोदकाम केले असता त्यांना एक मृत अर्भक आढळले. या ठिकाणी हँडग्लोव्हज, मीठ, रक्त लागलेल्या पिशव्या आणि इतर संशयास्पद वस्तूही आढळून आल्या, ज्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर इचलकरंजी विभागाचे डीवायएसपी विक्रांत गायकवाड, अप्पर तहसीलदार महेश खिलारे आणि पोलीस निरीक्षक एन.आर. चौखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

घटनास्थळाजवळ पंचतारांकित औद्योगिक वसाहत असल्यामुळे तेथे अनेक परप्रांतीय कुटुंबे राहतात. त्यामुळे हे कृत्य कोणी केले, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास एपीआय विकास शिंदे करत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.