भर पावसात राधानगरी तहसीलदार कार्यालयाच्या पटांगणात स्वातंत्र्यदिन उत्सवात साजरा.
भर पावसात राधानगरी तहसीलदार कार्यालयाच्या पटांगणात स्वातंत्र्यदिन उत्सवात साजरा.
---------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे.
---------------------------------
राधानगरी :-मुसळधार पडणाऱ्या पावसात तहसीलदार कार्यालयाच्या पटांगणात 79 स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
आज भर मुसळधार पावसामध्ये राधा नगरी तहसील कार्यालयाच्या पटांगणात राधानगरी. च्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
त्यावेळी राधानगरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी भर पावसामध्ये राष्ट्रध्वजाला सलामी दिली यावेळी राधानगरी मध्ये असणाऱ्या सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी ध्वजाला सलामी दिली राधानगरी मधील मुला मुलींनी राष्ट्रगीत सादर केले यंदाच्या स्वातंत्र्यदिनी राधानगरीमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने विद्यार्थी शासकीय अधिकारी शिक्षक यांची तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळत होते
Comments
Post a Comment