पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे बंद शाखा अभियंता समीर नि रूखे.

 पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे बंद शाखा अभियंता समीर नि रूखे.

-------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------

राधानगरीच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असल्याने राधा नगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून एक स्वयंचलित दरवाजा खुला असल्याची माहिती राधानगरी जलसंपदा शाखा चे अभियंता समीर निरुखे यांनी दिली


राधानगरीच्या पश्चिम भागात गेली दोन दिवस पावसाने जोडपून काढले असल्याने राधानगरी धरणाचे बुधवारी मध्यरात्री एक वाजता पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते पण आज गुरुवारी दिवसभर पावसाने विश्रांती दिल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून आज गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत चार मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणाची पाणी पातळी 347.02 फूट तर पाणीसाठा 8.26 टीएमसी इतका आहे व एका स्वयंचलित दरवाज्यातून १४२८ क्यूशेक तर बीओटी मधून १५०० क्यूशेक असा एकूण 2928 क्यूशेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू असून भोगावती नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता समीर निरुखे यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.