महाराष्ट्र ब्राम्हण सभेच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख पदी सौ धनश्रीताई उत्पात यांची निवड.

 महाराष्ट्र ब्राम्हण सभेच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख पदी सौ धनश्रीताई उत्पात यांची निवड.

कोल्हापूर / महाराष्ट्र ब्राम्हण सभा ही खूप जुनी संस्था आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली ही संस्था आहे देशभरात ह्या संस्थेचे काम चालते संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुलजी व्यास तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मयुरेश अरगडे कार्याध्यक्ष चैतन्य जोशी तसेच सर्व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यां तसेच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात यांची निवड करण्यात आली सौ धनश्रीताई उत्पात ह्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात संघटन बांधणी करून ह्या संस्थेचा विस्तार करतील व संस्थेच्या माध्यमातून ब्राम्हण समाजाच्या अडीअडचणी सोडवत समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहतील ही अपेक्षा ठेवत ही मोठी जवाबदारी संस्थेने त्याच्यावर सोपवली आहे सौ धनश्रीताई उत्पात यांच्या निवडीमुळे ब्राम्हण समाजामध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे कारण सौ उत्पात यांच्या सारखे निर्भीड पदाधिकारी संस्थेने निवडला आहे की जो सर्वसामान्य ब्राम्हण समाजाच्या व्यथा समस्या ह्या सरकार पर्यंत पोहचवून समाजाला योग्य दिशा दाखवत समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न सौ धनश्रीताई ह्या करतील अशी अशा व्यक्त करत ब्राम्हण समाजाला पुढे नेत समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगारीच्या संधी उपलब्ध करून देऊन एक भक्कम नेतृत्व करत समाजाला पुढे नेण्याचं काम सौ धनश्रीताई ह्या महाराष्ट्र ब्राम्हण समाजाच्या वत्तीने करतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या पुढिल कार्यास स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक मुख्य महासचिव कमलेश शेवाळे त्याच बरोबर विश्वस्त उमेश काशीकर, संगीताताई बोराडे, प्रशांत निकम, सविता तावरे, संचालक रवींद्र करंगुटकर विशाल बोराडे, वैशाली कांबळे, संदिप जाधव, संदिप वाघमारे, श्रीकांत देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.