मुरगूडमधे महापुराच्या पाण्यात अडकलेला ट्रक जेसीबी ने ओढून काढला.
मुरगूडमधे महापुराच्या पाण्यात अडकलेला ट्रक जेसीबी ने ओढून काढला.
-----------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-----------------------------
सतत धुवांधार पडणाऱ्या पावसामुळे मुरगूडला महापूराच्या पाण्याने वेढा घातल्यामुळे येथील महापूर रक्षक दल व मुरगूड नगरपालिका कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते या कामी पुढाकार घेत बेंगलोर हून आलेल्या एका ट्रकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चालकाने पुराच्या पाण्यात तब्बल एक किलोमीटर पर्यंत ट्रक नेला पुढे पाणी जास्त असल्याचे समजत असल्याने गाडी रिव्हर्स आणण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी पाण्यामध्येच बंद पडली
सदरची बाब मुरगुडचे शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट यांना समजल्यानंतर त्यांनी पहाटे साडेतीन वाजता नगरपालिका प्रशासन आणि जेसीबी चालकांना फोन करून स्वतः महापुरामध्ये जात याची माहिती दिली. यानंतर नगरपालिका कर्मचारी बबन बारदेस्कर ओंकार पोतदार, आणि जेसीबी मालक विक्रम गोधडे स्वतः जेसीबी घेऊन आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले अथक प्रयत्नाने त्यांनी कमरे एवढ्या पाण्यामधून हा ट्रक बाहेर काढला. वाहते पाणी आणि वरून पडणारा पाऊस पाण्यामध्ये सापांचा आणि किड्यांचा असणारा धोका यामधून मार्ग काढत या सर्वांनी हा ट्रक पाण्याबाहेर ओढून मुरगुड नाका नंबर एक या ठिकाणी आणून सोडला तसेच ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्या जेवणाची आणि नाश्त्याची सोय करून ते शिवभक्त घरी आले गेल्या वर्षीही छाती एवढ्या पाण्यामधून या शिवभक्तांनी दोन ट्रक बाहेर काढले होते. त्याच्
यावर्षीही त्यांनी ट्रक बाहेर काढले याबद्दल मुरगूड शहरासह परिसरामधून त्यांचे कौतुक होत आहे त्यांना नगरपालिकेचे यांचे सहकार्य लाभले यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्त सर्जेराव भाट,बबन बारदेस्कर ओंकार पोतदार, विक्रम गोधडे,भिकाजी कांबळे, मोहन कांबळे, विशाल कांबळे, अमित कांबळे, उपस्थित होते.

No comments: