कळंबा कारागृहात ‘रक्षाबंधन’ साजरा, कैद्यांना मिळाली बहिणीची माया.

 कळंबा कारागृहात ‘रक्षाबंधन’ साजरा, कैद्यांना मिळाली बहिणीची माया.

----------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

 संस्कार कुंभार 

----------------------------------

: प्रेमाचा आणि विश्वासाचा सण, रक्षाबंधन, यानिमित्त कळंबा मध्यवर्ती कारागृहात  एक अनोखा कार्यक्रम पार पडला. धनंजय महाडिक युवाशक्ती  प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आणि अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या महिलांनी कारागृहातील बंदीजनांना  आणि पोलीस अधिकाऱ्यांना राख्या बांधल्या.

या कार्यक्रमामुळे अनेक वर्षांनी बहिणीच्या मायेचा अनुभव मिळाल्याने अनेक कैदी भावुक झाले होते. रक्षाबंधन म्हणजे केवळ एक धागा नसून, ते प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे बंधन आहे, हा संदेश या उपक्रमाने दिला. उपस्थितांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता.

यावेळी कारागृहाचे अधीक्षक विवेक झेंडे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर, भागीरथी संस्थेच्या संचालक शिवानी पाटील, अभिजीत यादव, सुलोचना नार्वेकर, ऐश्वर्या देसाई, सीमा पालकर, स्नेहल खाडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि कारागृहातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.