गव्याच्या हल्ल्यात मांजरे येथील शेतकरी जखमी.

 गव्याच्या हल्ल्यात मांजरे येथील शेतकरी जखमी.

-----------------------------

मलकापूर प्रतिनिधी

रोहित पास्ते.

-----------------------------

     मांजरे तालुका शाहूवाडी येथील शेतकरी पांडुरंग बाळू पाटील वय 62 हे शेतात जनावरे घेऊन  गेले होते . त्यांच्यावर गव्याने हल्ला केला .यात त्यांच्या पायाला व डोक्याला जखम झाली त्यांना तात्काळ मांजरे येथील आरोग्य केंद्रात उपचार करून मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले .मात्र त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले .

      मिळालेल्या माहितीनुसार पांडुरंग पाटील हे जनावर राखण्यासाठी गेले होते यादरम्यान त्यांच्यावर गव्याने हल्ला केला .या हल्ल्यात त्यांच्या पायाला व डोक्याला जखम झाली सोमवार सकाळी ही घटना घडली .जखमी अवस्थेतील पाटील यांना तात्काळ मांजरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले .यानंतर त्यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ कोल्हापूर येथे दाखल पाठवण्यात आले .

    ग्रामीण रुग्णालयात माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर ,शेतकरी जन आक्रोश समितीचे आबासाहेब पाटील यांनी भेट देऊन झालेल्या हल्ल्याची माहिती घेतली व संबंधित शेतकऱ्याला वन विभागाने तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी वन अधिकारी यांच्याकडे केली .

      दरम्यान घटनेची माहिती मिळताच पेंडागळे वनपरिक्षेत्र अधिकारी सुषमा जाधव यांनी घटनास्थळी  कर्मचारी यांच्या समवेत भेट देऊन घटनेचा व  जागेचा पंचनामा केला . .याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की झालेल्या घटनेचा पंचनामा केला असून शासकीय नियमाप्रमाणे त्यांना जी काही मदत करता येईल ती केली जाणार आहे .

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.