शहापूर पोलीस ठाण्याची कारवाई, चार तासात कुणाचा छडा उघड.
शहापूर पोलीस ठाण्याची कारवाई, चार तासात कुणाचा छडा उघड.
----------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
सलीम शेख
----------------------------
इचलकरंजी : कौटुंबिक वादातून एका मित्राचा खून केल्याप्रकरणी शाहपूर पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अवघ्या चार तासांत अटक केली आहे. आरोपींना न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शाहपूर पोलीस ठाण्याची कारवाई करत १६ ऑगस्ट रोजी रात्री १०.१८ च्या सुमारास शाहपूरमधील गणेशनगर येथे ही घटना घडली होती. आरोपी संतोष दशरथ पागे (वय ३८) आणि संजय दशरथ पागे (वय ३६), दोघेही रा. गणेशनगर, शाहपूर.यांनी विनोद आण्णासो घुगरे (वय ३२), रा. गणेशनगर, शाहपूर यांचा दगडी वरवंट्याने ठेचून जबर जखमी केले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहपूर येथील गणेशनगरमध्ये राहणारे संतोष पागे, संजय पागे आणि विनोद घुगरे हे तिघे मित्र होते. विनोद घुगरे याचे संतोष पागे यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय संतोषला होता. याच कारणावरून संतोष आणि त्याचा भाऊ संजय यांनी १६ ऑगस्टच्या रात्री विनोदसोबत वाद घातला. या वाद विकोपाला जाऊन आरोपींनी विनोदच्या डोक्यात दगडी वरवंट्याने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने विनोदचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच शाहपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या चार तासांत संतोष पागे आणि संजय पागे या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, आणि पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, प्रमोद भांगरे, अर्जुन फाटले, सतीश कुंभार, शशिकांत ढोणे, रोहित डावाळे, आयुब गडकरी, पोपट भंडारे, गणेश लोहार, होमगार्ड महेश शेळके, अभिजीत चव्हाण आणि इम्रान मुल्ला यांचा समावेश होता.
दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत.
.jpg)

No comments: