शाहुवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात गौराईचे मोठ्या उत्साहात आगमन.
शाहुवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात गौराईचे मोठ्या उत्साहात आगमन.
--------------------------------
शाहुवाडी प्रतीनिधी
आनंदा तेलवणकर
--------------------------------
शाहुवाडी : करंजफेण व अणुस्कुरा परिसरातील सर्व गावांमध्ये गौराईचे आज मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात आगमन झाले
यावेळी करंजफेण व अजू बाजूच्या परिसरातील महिलांनी पारंपारिक संस्कृती जपत मोठ्या उत्साहात गौराईचे स्वागत केले
गौराई आगमनासाठी महिलांनी गावातील पानवठ्याच्या ठिकाणी एकत्र जमत गौराईचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करून घरी येत असताना गौराईची गीते म्हणत व झिम्मा फुगडी चा फेर धरत गौराईला घरी घेऊन आल्या घरी आलेल्या गौराईचे पूजन करण्यात आले गौराईच्या आगमनाने कांटे सह इतर परिसरातील सर्व गावांमध्ये भक्तिमय व आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे तसेच आली गौरीचे महत्त्व सांगणारी गौरी गीते गात महिलांनी आपला आनंद व्यक्त केला संध्याकाळी गौराबाईचे पुजन करून संध्याकाळी गौराईच्या मानाची असलेलील्या भाजी भाकरीच्या शिदोरीचा मान असलेल्या भाजी भाकरीची घरोघरी वाटप करण्यात आले
No comments: