कळे तालुका व्हावा पिसात्री ग्रामस्थांची मागणी.

 कळे तालुका व्हावा पिसात्री ग्रामस्थांची मागणी.

-------------------------------

बाजार भोगाव

सुदर्शन पाटील   

-------------------------------

पन्हाळा तालुक्यातील पिसात्री ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत कळे तालुका करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. पन्हाळा येथे प्रशासकीय कामांसाठी जाण्यात होणारी भौगोलिक गैरसोय, तसेच कळे येथे न्यायालय व पोलिस ठाणे सुरू झाल्यामुळे कळे तालुका व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.


सभेच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र करले होते. ग्रामपंचायत अधिकारी आर.टी. कुंभार यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. माजी सरपंच तुकाराम पाटील, केदारलिंग सोसायटीचे माजी चेअरमन केरबा आरडे, जयभवानी महिला दूध संस्थेचे सचिव रावसो पाटील यांनी या ठरावाचे समर्थन केले. सभेत रस्ते, वीज व अंगणवाडी सुविधा यांसह विविध विकासकामांवर चर्चा झाली. आमदार चंद्रदीप नरके यांनी रस्त्यांसाठी २० लाखांचा निधी दिल्याचे सांगण्यात आले. सोनारवाडीत वीज बल्ब बसवणे, अंगणवाडी साहित्य पुरवठा, तसेच सोनारवाडी साठी गायरानमधील जागेत अंगणवाडी इमारत उभारणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे ठरले.शासनाच्या विविध योजनांची माहिती कुंभार यांनी दिली. 

अशोक कांबळे, युवराज पाटील, बबन कांबळे, आशा लक्ष्मी पाटील, अमित पाटील, भाऊसो पाटील आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी  पांडुरंग पाटील  व ग्रामस्थ उपस्थित होते . आभार ग्रामपंचायत ऑपरेटर प्रकाश पाटील यांनी केले.शेवटी  प्रकाश पाटील यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.