के.डी. पाटील यांची EMSA कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड!

के.डी. पाटील यांची EMSA कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड!

--------------------------

गोकुळ शिरगाव प्रतिनिधी

सलीम शेख

--------------------------

: गोकुळ शिरगाव येथील सौ आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड जूनियर कॉलेजचे संस्थापक-अध्यक्ष के.डी. पाटील यांची महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (EMSA) च्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. पाटील यांच्या कार्याची आणि योगदानाची ही एक मोठी पोचपावती मानली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सौ आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड जूनियर कॉलेज एक अग्रगण्य आणि प्रसिद्ध शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करून नाव कमावले आहे. या यशात संस्थापक-अध्यक्ष के.डी. पाटील यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या दूरदृष्टी, कठोर परिश्रम, आणि शैक्षणिक कार्याप्रती असलेली निष्ठा यांमुळे शाळेने सातत्याने प्रगती केली आहे.

पाटील हे त्यांच्या अभ्यासूपणा, कार्यक्षमता आणि जिद्दीमुळे ओळखले जातात. त्यांच्या या गुणांमुळे त्यांना अनेक स्तरावर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता EMSA च्या जिल्हाध्यक्षपदी झालेली त्यांची निवड त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची आणि नेतृत्वाची साक्ष देते.

या नव्या जबाबदारीमुळे ते कोल्हापूर जिल्ह्यातील इंग्लिश मीडियम शाळांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली EMSA आणि जिल्ह्यातील इंग्लिश मीडियम शाळा अधिक प्रगती करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.