वन्य प्राण्याकडून झालेल्या पीक नुकसान भरपाई 6000 द्या... जनसुराज्य पक्षाची मागणी.

 वन्य प्राण्याकडून झालेल्या पीक नुकसान भरपाई 6000 द्या... जनसुराज्य पक्षाची मागणी.

--------------------------

मलकापूर प्रतिनिधी

रोहित पास्ते 

--------------------------

     शाहुवाडी तालुका ग्रामीण डोंगराळ असून येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असतो परंतु अलीकडच्या काळामध्ये वन्यप्राण्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये ऊस, मका, रताळी, सोयाबीन, भात, कडधान्य व भाजीपाला या पिकांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाची तटपुंजि मदत मिळते परंतु यावर शेतकरी बांधवांची गुजारा होत नाही तरी तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांच्या कडून प्रचंड प्रमाणामध्ये शेतीचे नुकसान होत आहे तरी शेतकऱ्यांना गुंठ्याला 6000 रक्कम भरपाई मिळावी. यासाठी आज शाहूवाडी येथील परिक्षेत्र वन अधिकारी उज्वला मगदूम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच वन्य प्राण्यांमध्ये डुक्कर हा प्राणी फारच पिकासाठी उपद्रवी ठरत आहे. त्यासाठी सदर प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त किंवा त्यावर ठोस उपाय योजना राबविण्यात यावे.

 यावेळी बोलताना जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा तालुका अध्यक्ष ए वाय पाटील म्हणाले,सदरच्या मागण्या शेतकऱ्यांच्या मान्य झाल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे झालेले नुकसान तसेच वन्य प्राण्याकडून मानवी झालेला हल्ला याबाबत विधानसभेत वारंवार आमदार डॉ. विनय कोरे सावकर यांनी तारांकित प्रश्न केलेला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर पाणीपुरवठा संस्था निर्माण केलेले होत्या त्या महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजनेतून ह्या संस्था वगळण्यात आलेला होत्या तरी त्या संस्थांच्या शेतकऱ्यांच्या वर प्रचंड असा अन्याय झाला होता हा प्रश्न  सावकर यांनी विधिमंडळात मांडला होता. या शेतकऱ्यांना परत कर्जमाफी योजनेत समाविष्ट करून त्यांना कर्जमाफी करून दिल्याबद्दल हा यशस्वी प्रयत्न सावकर यांच्या माध्यमातून यशस्वी झालेला आहे.  यावेळी जनसुराज्य पक्षाचे युवा अध्यक्ष ए वाय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, माजी पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत, युवा नेते युवराज काटकर, युवराज पाटील करंजफेन, माजी सरपंच कृष्णा पाटील, नामदेव पाटील, दत्ता भोसले, स्वप्नील लाड, स्वप्नील घोडे यांच्यासह जनसुराज्य पक्षाचे बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.