रिसनगाव येथील मराठा समाजातील पालकांचा निर्णय शिवा संघटनेचे प्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांच्या शाळेतून काढणार पाल्यांची दाखले.
रिसनगाव येथील मराठा समाजातील पालकांचा निर्णय शिवा संघटनेचे प्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांच्या शाळेतून काढणार पाल्यांची दाखले.
------------------------------------
लोहा, प्रतिनिधी
अंबादास पवार
------------------------------------
मागील कांही दिवसांपूर्वी मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथे मनोज पाटील जरांगे यांनी आंदोलन केले. राज्य सरकार कडून मराठा आरक्षण संदर्भात शासन आदेश निर्गमित केल्यामुळे सदर आंदोलन मागे घेण्यात आले. सदरील शासन आदेशाविरुद्ध शिवा संघटनेचे प्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्याविरुद्ध मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून तालुक्यातील रिसनगाव येथील प्रा. मनोहर धोंडे यांच्या स्व. मीनाताई ठाकरे आश्रम शाळा येथून मराठा समाजाच्या पालकांनी आपल्या पाल्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांची मागणी शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे एका संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे.
मराठा समाजास ओबीसींचे आरक्षण मिळावे यासाठी कांहीं कालावधी पासून आंदोलन सुरू असून मराठा प्रमुख आंदोलक मनोज पाटील जरांगे यांनी मुंबई येथे मागील कांहीं दिवसांपूर्वी अमरण उपोषण सुरू केले होते. राज्य सरकारच्या वतीने मराठा आंदोलन कर्त्यांच्या मागण्या शासन आदेश काढून मान्य करत सदर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र सदर आरक्षणा विरोधात अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे प्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याविरुद्ध मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील प्रा. मनोहर धोंडे यांचे आसलेले स्व. मीनाताई ठाकरे आश्रम शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांची नावे कमी करून आम्हाला शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) द्यावी अशी मागणी रिसनगाव येथील मराठा समाजातील पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर एकूण बावीस पालकांच्या स्वाक्षरी आहेत. त्यामध्ये संतोष पवार, सतीश पवार, बिभीषण पवार, हणमंत पवार, नारायण पवार, विष्णुकांत पवार, रोहिदास पवार, अंकुश पवार, रणजीत पवार, दिगंबर पवार, विश्वंभर पवार, अंगद पवार, गजानन पवार आदींसह इतर पालकांच्या स्वाक्षरी आहेत.
Comments
Post a Comment