बँक ऑफ इंडिया लोहा शाखेने महिला बचत गटास केले दीड कोटी कर्ज वाटप.
बँक ऑफ इंडिया लोहा शाखेने महिला बचत गटास केले दीड कोटी कर्ज वाटप.
--------------------------------
लोहा प्रतिनिधी
अंबादास पवार
--------------------------------
नुकतेच लोहा बँक ऑफ इंडिया शाखेचा पंधरावा वर्धापन दिन लोहा बँक ऑफ इंडिया शाखेत साजरा आला. बँक शाखेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लोहा शाखे कडून तालुक्यातील महिला बचत गटांना एकूण दीड कोटी रुपयांच्या कर्जांचे वाटप करण्यात आले.
लोहा येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या पंधराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने लोहा शाखेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमास सोलापूरचे झोनल प्रबंधक चंद्रशेखर मंत्री यांच्या हस्ते लोहा तालुक्यातील महिला बचत गटांना दीड कोटी रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी लोहा शाखेचे प्रबंधक अण्णाराव राठोड यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे सदर कार्यक्रमाप्रसंगी बँकेसाठी उत्कृष्ट काम करणारे बँक मित्र यांना सन्मानचिन्ह व प्रशिक्षित पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी कृषी वित्त विभाग प्रमुख सोलापूरचे अतुल चव्हाण, शैलेश गायकवाड, महेश नाईक, गंगाधर बारसे, शंकर गवळी., गितेश आटकोरे, बँक मित्र सुधीर महाबळे सह बचत गटाच्या सर्व महिला बँक कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment