महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून मौजे बामनोली येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून मौजे बामनोली येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय.
-------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजु कदम
-------------------------------------
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सांगली यांना अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालय यांचे कडून तोंडी व लेखी पत्रव्यवहार केला आहे गेली ४ ते ५ महिने पिण्याच्या पाण्याचा गंभीर विषय लक्षात घेता ग्रामस्थ,सर्व नागरिक यांना पाण्याची गैरसोय होत आहे रोज पाण्यासाठी वाद,संघर्ष होत आहे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे पंचायत समिती मिरज गटविकास अधिकारीसो, जिल्हा परिषद सांगली मुख्य कार्यकारी अधिकारीसो यांना ही निवेदन दिलेल आहे तरीही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही त्या अनुषंगाने दिनांक १०/०९/२०२५ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय सांगली येथे समक्ष भेटून पाण्याच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल गावातील विद्यमान सरपंच गीता ताई सुभाष चिंचकर, उपसरपंच विष्णू राजाराम लवटे, पॅनल प्रमुख सुभाष अण्णा चिंचकर,माजी सरपंच राजेश सन्नोळी,ग्रा.पं.सदस्य अर्चना पाटील,अनिता जाधव,संगीता पाटील ,पाणी पुरवठा समिती सदस्य कमल शिंदकर , व ग्रामस्थ यांनी उपकार्यकारी अभियंता श्री. व्हि.टी गायकवाड साहेब यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले असता, साहेबांनी वसंतदादा सूतगिरण ते रेल्वे पूल पर्यंत पाईप लाईन बदलण्याचे काम सुरू आहे त्यामुळे MIDC कडून होणारा नियमित पाणीपुरवठा आठवड्यातून २ दिवस पाईप लाईन च्या कामासाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे सांगितले व तसेच सदर समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
Comments
Post a Comment