मुडशिंगी गावात घरफोडी; दोन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास.
मुडशिंगी गावात घरफोडी; दोन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास.
------------------------------
शशिकांत कुंभार
------------------------------
कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील मुडशिंगी गावात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ₹२,५१,२००/- किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेची तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ९ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास घडली. सुनील श्रीकांत परिट यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे गंठण, अंगठ्या, कर्णफुले, सोनसाखळ्या आणि चांदीचे दागिने तसेच काही रोख रक्कम लंपास करण्यात आली.
याचबरोबर, चोरट्याने शेजारील इतर दोन दुकानेही लक्ष्य केली. सोनाली अशोक खरसे यांच्या स्टेशनरी दुकानातून ₹५,०००/- आणि गुरुदेव बाबुराव तोडकर यांच्या 'आराध्या लेडीज वेअर' दुकानातून ₹३,५००/- रोख रक्कम चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
एकूण दोन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पोलीस उपनिरीक्षक पिल्लाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

No comments: