गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीच्या समस्यांवर आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत बैठक.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीच्या समस्यांवर आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत बैठक.
------------------------------
संस्कार कुंभार
------------------------------
कोल्हापूर: गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी गोशिमा कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत आमदार महाडिक यांनी उद्योजकांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत असोसिएशन (गोशिमा) चे अध्यक्ष सुनील शेळके यांनी आमदार महाडिक यांचे स्वागत केले. त्यांनी वसाहतीतील प्रलंबित समस्या आणि उद्योजकांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि इतर पायाभूत सुविधांचा बद्दल ही चर्चा झाली. यावेळी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले, "गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत ही कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. येथील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांची मला जाणीव आहे. या समस्या सोडवण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांशी समन्वय साधून लवकरच उपाययोजना केल्या जातील."
उद्योजकांच्या प्रतिनिधींनी वसाहतीतील उद्योगांच्या समस्याचे निराकरण ,मूलभूत सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
या बैठकीला गोशिमाचे उपाध्यक्ष संजय देशिंगे यांच्यासह अमोल यादव, राजवर्धन जगदाळे, स्वरूप कदम, रामचंद्र लोहार, नचिकेत कुंभोजकर, बंडोपंत यादव, अनिरुद्ध तगारे, व्ही.आर.जगताप आणि विनयकुमार चौगुले यांसारखे प्रमुख उद्योजक उपस्थित होते. या बैठकीमुळे उद्योजकांना त्यांच्या समस्या मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली आहे.

No comments: