अंबप ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कार्यशाळा.
अंबप ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कार्यशाळा.
अंबप : ग्रामपंचायत अंबप येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकनियुक्त सरपंच सौ. दिप्ती विकासराव माने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी संतोष कांबळे यांनी केले. यानंतर सरपंच सौ. दिप्ती माने यांनी उपस्थितांना पी.पी.टी. द्वारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेची माहिती दिली. तसेच ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करून सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचा आभारप्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य अविनाश अंबपकर यांनी केले.
या कार्यशाळेस उपसरपंच आशिफ मुल्ला, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संगिता जाधव, अजित माने, सारिका हिरवे, माणिक दाभाडे, ज्योती माने, रेखा गायकवाड, जयश्री शिंदे, सरिता कांबळे तसेच अंगणवाडी सेविका-मदतनीस, महिला बचत गट प्रतिनिधी, गावातील शाळांचे शिक्षक, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी किशोर जासूद)

No comments: