जयसिंगपूरात सराईत गुन्हेगार सूरज पवार ताब्यात.
जयसिंगपूरात सराईत गुन्हेगार सूरज पवार ताब्यात.
--------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
--------------------------------
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.
जयसिंगपूर पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार सूरज राजू पवार उर्फ गाडीवडर (रा. ५२ झोपडपट्टी, शाहूनगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ) यास २ वर्षांकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले असतानाही तो रणवीर चौक गणेशमंडळ, शाहूनगर परिसरात आढळून आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकूर यांना बातमीदारामार्फत याची माहिती मिळताच त्यांनी पथकासह शाहूनगर येथे कडेकोट सर्च ऑपरेशन राबवले. यावेळी सूरज पवार याला ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४२ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर तसेच अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस अंमलदार संदीप बांडे, प्रकाश हंकारे , अभय सोनुले , निलेश शेवाले , विक्रम मोरे, सुप्रिया भेंडवडे , सुजाता चौगुले आदींचा समावेश होता.
दरम्यान, शिरोळ, जयसिंगपूर, हातकणंगले व वडगाव परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या भागात जिल्ह्यातून हद्दपार केलेले आरोपी राहत असल्याची माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
No comments: