अंबप ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम यशस्वी.

 अंबप ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम यशस्वी.

--------------------------------

अंबप प्रतिनिधी 

किशोर जासूद

--------------------------------

माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत अंबप ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणपती विसर्जन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ग्रामपंचायतीच्या वतीने कृत्रिम कुंडांची सोय तसेच निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता कृत्रिम कुंडामध्ये केले. संकलित झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यात येणार आहे.सरपंच सौ. दीप्ती विकासराव माने व उपसरपंच आशिफ अबुबकर मुल्ला यांनी सांगितले की, “या उपक्रमाचा उद्देश निसर्गस्नेही गणेशोत्सव साजरा करून पर्यावरणाचे रक्षण करणे हा आहे. नागरिकांनी दिलेला प्रतिसाद अभिनंदनीय आहे.”

या उपक्रमात गावातील तरुण मंडळे, महिला बचतगट, शाळा व सामाजिक संस्था यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यामुळे पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली.

यावेळी गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले शबाना मोकाशी यांनी अंबप ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी कांबळे साहेब, सदस्य संदीप पाटील, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड, महेश माने तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

अंबप ग्रामपंचायत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श घालून देत असून हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.