कसबा ठाणे (ता. पन्हाळा )येथील शेतकरी,ई - पीक पाहणी करताना सर्व्हरडाऊन मुळे चिंताग्रस्त.
कसबा ठाणे (ता. पन्हाळा )येथील शेतकरी,ई - पीक पाहणी करताना सर्व्हरडाऊन मुळे चिंताग्रस्त.
---------------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
---------------------------------
कसबा ठाणे येथील ग्राममहसूल अधिकारी सुरेंद्रसिंग इंद्रेकर यांचे मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी केलेले, तथापि ई पीक पाहणी करत असताना वारंवार सर्व्हरडाऊन आहे, शेतकरी पीक पाहणी करत असताना भौगोलिक नकाशा उपलब्ध नाही, तसेच मुख्यता डोंगर भाग असल्यामुळे लोकांना हा कायमच सर्व्हर ची समस्या उद्भवत असते. शेतकरी मुख्य ठिकाण दर्शवत नाही असे मॅसेज येत आहेत, त्यामुळे शेतकरी पीक पाहणी करताना त्रस्त झालेले आहेत, ग्राममहसूल अधिकारी यांनी योग्य रित्या नेहमी मार्गदर्शन केले आहे पण सर्व्हर चे अडचणीमुळे ई पीक पाहणी करणेस अडचणी येत आहेत, तसेच ग्राममहसूल अधिकारी सुरेंद्रसिंग ईद्रेकर यांच्या सूचनेनुसार गणपती उत्सवापासून दवंडी देऊन, शेतकऱ्यांना मार्गदर्शन सतत चालू आहे, व योग्य ती उपाय व्यवस्था व्हावी,सर्व्हरडाऊन मुळे मुदतवाढ मिळावी ही गावातील शेतकऱ्यांकडून मागणी आहे.
Comments
Post a Comment