प्रा. तनुजा लोखंडे नेट परीक्षा उत्तीर्ण.
प्रा. तनुजा लोखंडे नेट परीक्षा उत्तीर्ण
--------------------------
मलकापूर प्रतिनिधि
रोहित पास्ते
--------------------------
शाहुवाडी तालुक्यातील वारुळ येथील प्रा. तनुजा मारुती लोखंडे यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR-UGC NET) ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे.
सध्या त्या डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर येथे रसायनशास्त्र विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातून येऊन शिक्षणाची धडपड करणाऱ्या तनुजा लोखंडे यांनी कठोर परिश्रमाच्या बळावर मिळवलेले हे यश सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
घरात शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना तनुजा लोखंडे यांनी मिळवलेली ही कामगिरी प्रेरणादायी ठरत असून समाजातील विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत उदाहरण आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment