Header Ads

गणेशोत्सव सामाजिक सलोख्याचा आदर्श – अमोल ठाकूर.

 गणेशोत्सव सामाजिक सलोख्याचा आदर्श – अमोल ठाकूर.

----------------------------

हातकणंगले प्रतिनिधी

 नामदेव भोसले

----------------------------

 गणेशोत्सव हा केवळ आनंद, उत्साह आणि भक्तीचा सण नसून तो समाजात एकता, सांस्कृतिक जाणीव आणि सार्वजनिक हित जपणारा सण आहे. त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळाने समाजोपयोगी व प्रेरणादायी उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने उत्सवाचा आदर्श घडवावा, असे आवाहन जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी नुकतेच केले.


गणेशोत्सव काळात गणेश मंडळांनी आरास व मिरवणुकीपर्यंतच स्वत:ला मर्यादित न ठेवता, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी, पर्यावरण संवर्धन असे समाजहिताचे उपक्रम आयोजन करावेत, अशी सूचना श्री. ठाकूर यांनी केली. "प्रत्येक मंडळाने आपल्या परिसरात काहीतरी वेगळे करुन समाजासाठी उदाहरण घडवावे," असा संदेश त्यांनी दिला.


यावेळी त्यांनी उत्सव काळात सुरक्षिततेसाठी मंडपात CCTV कॅमेरे बसवावेत, गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही आवाहन केले. उल्लेखनीय उपक्रम आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या मंडळांना विशेष पुरस्कार व सन्मान देण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


"गणेशनवातील कोणतीही विघ्नसृष्टी समाजात न घडता, सण शांततेत व एकात्मतेने साजरा व्हावा, हीच समाजासमोर खरी प्रेरणा आहे," असे स्पष्ट करत, भाविकांनी हा सण उत्साही, शिस्तबद्ध आणि समाजहिताच्या दृष्टीने साजरा करावा, असे श्री. ठाकूर यांनी सांगितले।

No comments:

Powered by Blogger.