गणेशोत्सवातील महाप्रसाद रद्द करून मुंबईच्या मराठा आंदोलकांना अल्पोपहार पाठवला सुरूपलीच्या गणेश तरुण मंडळाचा विधायक कार्यक्रम.
गणेशोत्सवातील महाप्रसाद रद्द करून मुंबईच्या मराठा आंदोलकांना अल्पोपहार पाठवला सुरूपलीच्या गणेश तरुण मंडळाचा विधायक कार्यक्रम.
-----------------------------
जोतीराम कुंभार
-----------------------------
सुरुपली (ता.कागल) येथील गणेश तरुण मंडळाने उत्सवातील महाप्रसाद रद्द करून त्याच रकमेतून मुंबईच्या मराठा आंदोलकांना अल्पोपहार पाठवला.
जनसेवा हीच ईश्वरसेवा या भक्तीतत्वानुसार या मंडळाने मुंबईतल्या आंदोलकांची मदत करायचे ठरवले.पावसात सुद्धा मराठा आरक्षणाचा लढा देणाऱ्या आंदोलकांचे खाण्या पिण्याचे हाल होत होते.त्यांच्या साठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण मदत केली पाहिजे.किंबहुना तीच खरी गणेश भक्ती असे मानून मंडळाने आंदोलकांना केळी,बिस्किटे,चिवडा,पाण्याच्या बाटल्या असे अल्पोपहार साहित्य पाठवले.सर्व साहित्य एका टेम्पो ट्रक मध्ये भरून रातोरात मुंबईच्या आझाद मैदानावर पोचवले.मराठा आरक्षण आंदोलनास कृतीतून पाठिंबा देणाऱ्या या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.इतरही कांहीं मंडळानी हा आदर्श घेण्याचे ठरविले आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.त्यांचा लढा यशस्वी होवो अशी प्रार्थना गणरायापुढे करण्यात आली.
मदत पाठवतअसताना मंडळाच्या सर्व सदस्यांनी शिवछत्रपती आणि मराठा आंदोलनाच्या घोषणा दिल्या.
तसेच सुरुपली गावातील अनेक दानशूर व्यक्तीनी रोख स्वरूपात मदत केली.सुरुपली नंतर परिसरातील अनेक गणेश मंडळांनी सुद्धा मराठा आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
No comments: