गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश्य आवाजामुळे ध्वनीप्रदूषण — १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश्य आवाजामुळे ध्वनीप्रदूषण — १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.
--------------------------
संस्कार कुंभार
--------------------------
कोल्हापूर: उंचगाव (ता. करवीर) येथे दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे सिस्टीमवर मोठ्या आवाजात हिंदी-इंग्रजी गाणी व कर्णकर्कश्य संगीत वाजवून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी १० आरोपींविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या मिळाल्या माहितीनुसार उंचगाव कमान ते मंगेश्वर मंदिर या मार्गावर विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पार पडत होत्या. या मिरवणुकीत सहभागी मंडळांच्या गणपतीसमोर आरोपींनी त्यांच्या ताब्यातील डीजे सिस्टीमवर अत्यंत मोठ्या आवाजात गाणी वाजवली. पोलिसांनी आवाज कमी करण्याची सूचना दिली असतानाही आरोपींनी ती न मानता ठरवून दिलेल्या डेसीबल मर्यादेपेक्षा जास्त आवाजात संगीत वाजवत ध्वनीप्रदूषण सुरू ठेवले.
गुन्हा दाखल व तपास
फिर्यादी सतिष दिलीप माने (वय ३९), नेमणूक गांधीनगर पोलीस ठाणे यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपींनी मानवी जीवित, आरोग्य व सुरक्षिततेला धोका पोहोचवणारी कृती केली असून, मिरवणुकीसाठी दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे. गुन्हा दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस अंमलदार विजय कोळी करत आहेत.
आरोपींची नावे व पत्ते
या प्रकरणात खालील १० आरोपींचा समावेश आहे:
| क्र. | नाव | राहणार |
|-----|------|--------|
| 1 | आशिष जयपाल सुर्यवंशी | आळते, ता. हातकणंगले |
| 2 | सिध्दार्थ रामचंद्र भोसले | कोरेगाव, जि. सातारा |
| 3 | उमेश कुंडलीक वाईंगडे | उंचगाव, ता. करवीर |
| 4 | वैभव माणकेश्वर धुरूपे | न्यु सांगवी, पुणे |
| 5 | सचिन आनंदा जोंधळे | बाचणी, ता. कागल |
| 6 | अक्षय तानाजी मोरे | नेर्ले, ता. करवीर |
| 7 | प्रबुध्द महेंद्र निकाळगे | फलटण, जि. सातारा |
| 8 | फैयाज धवल मकानदार | रेठरे बुद्रूक, ता. कराड |
| 9 | ओंकार माणिक राजपूत | देशमुख गल्ली, सातारा |
| 10 | रितेश राजेश पाटील | १०० फुटी रोड, सांगली |
ही कारवाई सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, पोलीस प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलल्याचे दिसून येते.
No comments: