अखेर वानरमारी समाजाचे घरकुलचे स्वप्न साकार होणार.
अखेर वानरमारी समाजाचे घरकुलचे स्वप्न साकार होणार.
---------------------------------
सुदर्शन पाटील
---------------------------------
याबाबत दैनिक सुपर भारत व फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र ने उठवला होता आवाज
बाजारभोगाव (ता ५)
पोंबरे (ता. पन्हाळा) येथील वानरमारी समाजाच्या
११ कुटुंबांना घरकुलासह पाच गुंठे जमिन देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता, तो गेली पाच वर्षे लालफितीत अडकला होता अखेर यावर भारतीय दलित महासंघाच्या वतीने आज बाजारभोगाव (ता पन्हाळा) येथे नदीपात्रात सामुदायिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार आंदोलन सुरू झाले पण यांची प्रशासनाने तातडीने दखल घेत १५ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे वानरमारी समाजाचे घरकुल योजनेचे स्वप्न साकार होण्याची आशा निर्माण झाली
पाच वर्षांपूर्वी शासनाने ११ कुटुंबांना घरकुलासह पाच गुंठे जमिन देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र, अद्याप प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. शासनाच्या आश्वासनांना हरताळ फासल्यामुळे उपेक्षित वानरमारी समाज जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या मूलभूत हक्कांपासून वंचित राहिला आहे. याबाबत दैनिक सुपर भारत व युट्यूब चॅनेल फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र ने ' 22 आॕगस्ट' रोजी बातमी प्रसिद्ध करून आवाज उठवला होता. वानरमारी समाजावस झालेल्या अन्यायाविरोधात व न्याय हक्कासाठी बाजारभोगाव चौकात कार्यकर्ते व वानरमारी समाजातील लोक जमा झाले. येथून सर्व जलसमाधी आंदोलन करण्यासाठी नदीकडे निघाले होते. यावेळी त्याच्याशी मंडल अधिकारी नलीनी मोहिते यांनी तलाठी कार्यालयात चर्चा केली. यावेळी आंदोलकांना सदर घरकुल व जातीचे दाखले देण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे त्यातील त्रुटी दूर करून पुढील आॕक्टोबर महिन्यातील पंधरा तारखेपर्यत पूर्ण होईल असे आश्वासन दिले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सदर प्रस्ताव पुणे येथे पाठवला आहे. असे सांगितले
यावेळी आंदोलनात भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे .अनिरुद्ध गौतम कांबळे .पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीप मोरे, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख बबलू चौगुले पन्हाळा तालुकाध्यक्ष गणेश कांबळे, सांगली जिल्हाध्यक्ष विनोद आढाव, धनाजी तुपारे चंद्रकांत काळे अरुण कांबळे तुकाराम पवार आकाश कांबळे विठ्ठल कांबळे प्रसाद सावंत संदीप कांबळे विकी भोसले अविनाश कांबळे दत्ता सोयगावकर प्रज्ञावंत कांबळे यांच्यासह वानरमारी समाजातील लोक उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हावलदार विजयानंद कुंभार बंदोबस्त ठेवला होता.
कोट १
भारतीय दलित महासंघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे जाहीर केले. वानरमारी समाजासच्या जमीन व घरकुल योजनेची दिवाळीपूर्वी अमंलबजावणी नाही केली तर जिल्हाधिकारी कार्यालयास कुलूप घालणार असा ही इशारा यावेळी दिला.
श्रीकांत कांबळे
राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय दलित महासंघ
फोटोओळ- बाजारभोगाव येथे भारतीय दलित महसंघाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करताना श्रीकांत कांबळे व महासंघाचे पदाधिकारी
Comments
Post a Comment