सापडलेले दागिना दिला परत ,सुरेंद्र पाटील यांचा प्रामाणिकपणा.

 सापडलेले दागिना दिला परत ,सुरेंद्र पाटील यांचा प्रामाणिकपणा.

----------------------------

सलीम शेख 

----------------------------

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एका कर्मचाऱ्याने सापडलेला पाच तोळ्यांचा सोन्याचा दागिना प्रामाणिकपणे परत करून आदर्श निर्माण केला आहे. सुरेंद्र किरण पाटील, असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांच्या या सचोटीबद्दल बँकेने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व कौतुक केले.

बँकेच्या प्रधान कार्यालयात शेती कर्ज विभागात कार्यरत असलेले सुरेंद्र पाटील यांना दोन दिवसांपूर्वी बँकेच्या नव्या इमारतीमागील पार्किंगमध्ये मोटरसायकल काढताना पाच तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट सापडले. त्यांनी तत्काळ आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली, पण कोणीही पुढे आले नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या शेजारी मोटरसायकल पार्क केलेल्या विकास पाटील या बँक कर्मचाऱ्याशी संपर्क साधला. सुरुवातीला विकास पाटील यांना त्यांची कोणतीही वस्तू हरवली नसल्याचे वाटले. मात्र, थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या हातातील ब्रेसलेट हरवले आहे.

त्यानंतर विकास पाटील यांनी पुन्हा सुरेंद्र पाटील यांना फोन करून विचारणा केली. सुरेंद्र पाटील यांनी त्यांना लगेचच प्रधान कार्यालयात बोलावून ते सोन्याचे ब्रेसलेट त्यांच्या स्वाधीन केले. सुरेंद्र पाटील यांच्या या प्रामाणिकपणाचे बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कौतुक होत आहे. 'प्रामाणिकपणा हाच माणसाचा मौल्यवान दागिना आहे', असे म्हणत अनेकांनी त्यांच्या कृतीला सलाम केला. सुरेंद्र पाटील हे बँकेचे अध्यक्ष व दिवंगत आमदार कै. शामराव भिवाजी पाटील- बापूजी यांचे नातू आहेत. त्यांच्या या सचोटीने त्यांनी आपल्या कुटुंबाचा वारसा जपला आहे, असेही बोलले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.