विद्यार्थी शिक्षक दिन उत्साहात साजरा — गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिरात विद्यार्थ्यांनी घेतले अध्यापनाचे धडे.
विद्यार्थी शिक्षक दिन उत्साहात साजरा — गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिरात विद्यार्थ्यांनी घेतले अध्यापनाचे धडे.
---------------------------
सलीम शेख
---------------------------
कागल : भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिर, कागल येथे विद्यार्थी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या विशेष दिवशी इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत प्रवेश करून अध्यापनाचे धडे दिले. स्वरा वडगाव, पूजा लोहार, वेदांत सोनुले, मधुरा कोरवी, आफान बागवान आणि अनुज सनगर यांनी विविध विषय शिकवून शिक्षकांची भूमिका समर्थपणे पार पाडली. तसेच रिषभ सनगर यांनी शिपाई पदाची जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेतून शिस्त, ज्ञान आणि समर्पण यांचे दर्शन घडवले. शाळेचे मुख्याध्यापक नदाफ सर, गाडेकर सर, पाटील सर आणि पिस्ते सर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले, ज्यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी ठरला.
विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग पाहता, हा उपक्रम शिक्षणाच्या नव्या दृष्टिकोनाला चालना देणारा ठरला आहे.
Comments
Post a Comment