मेन राजाराम मध्ये रानभाज्या महोत्सव उत्साहात साजरा
मेन राजाराम मध्ये रानभाज्या महोत्सव उत्साहात साजरा.
---------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
सुनिल पाटील
---------------------------
कोल्हापूर: येथील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या प्रशालेतील कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याच्या जंकफूड,फास्टफुडच्या जमान्यात औषधी रानभाज्या, पालेभाज्यांचा वापर दैनंदिन आहारात कमी होताना दिसत आहे.वेगवेगळ्या असणा-या या पालेभाज्या,त्यांचे नित्याच्या जीवनातील महत्व काय आहे याची माहिती उद्घाटक प्राचार्य डॉ गजानन खाडे सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.प्रशालेत आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ खाडे बोलत होते.
आजची तरूणाई रानभाज्या व पालेभाज्या खाण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.या तरूणाईने आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्या जेवणात या ऋतूनुसार नैसर्गिक उगवणा-या रानभाज्या खाल्या पाहिजेत.तसेच या महोत्सवामुळे कला शाखेतील विद्यार्थी भविष्यात खाद्यसंस्कृती त करिअरसुद्धा करू शकतात.त्यानुसार या उपक्रमाकडे सकारात्मक दृष्टीने पाहता येऊ शकते.रानभाज्यातील असणारी जीवनसत्त्वे, पोषकद्रव्ये आपली प्रतिकारशक्ती वाढवतात.शरीराला सात्विक उर्जा,शक्ती आणि ताकद देतात.या हिरव्या पालेभाज्यांचा वापर आहारात करणे हितावह आहे याविषयी माहिती वर्गशिक्षक प्रा सुषमा पाटील यांनी सांगितली.
श्रुतिका कोंडा या विद्यार्थिनीने आणलेल्या सर्व भाज्याची माहिती विस्ताराने सांगितली. यामध्ये सलोनी बारे,प्रतिक्षा बोडके,सिद्धी माने,मेहजबीन मुल्लाणी, श्रेया कळंत्रे,प्रतिक्षा काटे, श्रुतिका कोंडा,जयश्री पाटील, श्रुतिका भोपळे,अंजली कांबळे ,सुप्रिया तिबिले ,दिव्या धावले,पुनम कुंभार,श्रद्धा कोळी, अमृता जगताप, माया भुजिंगे, स्वराजंली पाटील या विद्यार्थिनींनी पातरी,नाल,करडई, मोहोर, तांदुळ,पालक,चाकवत,शेवगा,पोकळा,शेपू,मेथी,चवळीची,भोपळीची भाजी, अळूच्या वड्या,शेंगदाणे,दोडका, कडिपत्ता,कारले चटणी,ठेचा,बाजरी, तांदूळ,ज्वारी,मका भाकरी,सॅलड अशा वैविध्यपूर्ण भाज्या आणून या महोत्सवाचे वेगळेपण जपले.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रा अनिल लाड, प्रास्ताविक प्रा बाबासाहेब माळवे, आभार प्रा बी टी यादव यांनी मानले.याप्रसंगी उपप्राचार्या प्रा वनिता खडके,प्रा राहूल देशमुख,प्रा अयोध्या धुमाळ,प्रा दिपा लोहार,प्रा रेश्मा पाटील,प्रा.प्रमिला मळगे प्रा.एस वाय कुंभार,प्रा एच एम काटकर,प्रा विकास पाटील,प्रा भाऊसाहेब धराडे, डॉ संतोष माने,प्रा . सृष्टी तांदळे शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.या महोत्सवाचे संयोजन प्रा सुषमा पाटील यांनी केले होते.
Comments
Post a Comment