सहा एमएलडी एसटीपी प्रकल्पाच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी.
सहा एमएलडी एसटीपी प्रकल्पाच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी.
-----------------------------
सौ.रजनी कुंभार
-----------------------------
कोल्हापूर, : दुधाळी येथील सहा एमएलडी एसटीपी प्रकल्पाच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दुपारी पाहणी केली. अमृत योजना पहिल्या टप्पा अंतर्गत मंजूर असलेल्या दोन एसटीपी पैकी चार एमएलडीचा लाईन बाजार येथील एसटीपी कार्यान्वीत झाला आहे. तर दुधाळी येथील सहा एमएलडी एसटीपीचे काम अंतिम टप्यात असून याचे 95 टक्के काम पुर्ण झाले आहे. याठिकाणी गुरुत्व नलिका व दाब नलीकेचे काम राहिले असून प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी समक्ष फिरती करताना ठेकेदारास कोणत्याही परिस्थीतीस सप्टेंबर अखेर सदरचे काम पुर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच या कामामध्ये कोणत्याही प्रकारची हयगत झाल्यास कडक कारवाई करण्याच्या सूचनाही ठेकेदारास दिल्या आहेत.
यावेळी उप-आयुक्त कपिल जगताप, जल अभियंता हर्षजीत घाटगे, महाराष्ट्र जिवन प्राधीकरणाचे उपअभियंता मुरलीधर भोसले, कनिष्ठ अभियंता योगेश उलपे, संजय नागरगोजे उपस्थित होते.
Comments
Post a Comment