Frontline News Maharashtra

सांगलीत खळबळजनक घटना : पतीने पत्नीचा खून करून स्वतः पोलिसात हजर.

No comments :

 सांगलीत खळबळजनक घटना : पतीने पत्नीचा खून करून स्वतः पोलिसात हजर.

--------------------------------

शशिकांत कुंभार 

--------------------------------

मिरजेत घडलेल्या घटनेनंतर सांगलीतही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली शहरातील शांतीनगर परिसरात पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मृत विवाहितेचे नाव काजल प्रशांत एडके (वय अंदाजे ३०) असून तिचा पती प्रशांत एडके यानेच खून केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. घरगुती कारणातून वाद उफाळून आल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.


घटनेनंतर प्रशांत एडके स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.


या घटनेमुळे शांतीनगर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत.

No comments :

Post a Comment